सालीम अली अभयारण्यात कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

येरवडा - मुळा-मुठा नदीकाठावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील वृक्षतोड तत्काळ थांबवून येत्या पावसाळ्यात पाच हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबरोबरच लोखंडी प्रवेशद्वार व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण अभयारण्य संरक्षित करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील अनेक वृक्ष जळून खाक झाले होते. या पार्श्‍वभूमीवर सौरभ राव यांनी शनिवारी सकाळी पक्षी अभयारण्याला भेट दिली. या वेळी पक्षितज्ज्ञ डॉ. ऐराक भरूचा, सारंग ऐडवाडकर, सतीश प्रधान, गौतम इदनामी उपस्थित होते. जीवित नदी, जनवाणी, आदर पूनावाला क्‍लिन सिटी इनेसिटिव्ह, नॅशनल सोसायटी फॉर क्‍लीन सीटीज्‌, क्‍लीन रिव्हर सोसायटी, स्वरूप वर्धिनीचे विद्यार्थी, दिल्ली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.राव यांनी संपूर्ण पक्षी अभयारण्य पाहणी केली. या वेळी त्यांनी उद्यान विभागाला विविध उपयायोजना करण्यासंदर्भात सूचना दिल्या. 

डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य विकसित करण्याची गरज आहे. येथे येणारे पक्षी पाहता व अभ्यासता येईल, असे कल्याणीनगर येथील बाफना यांनी सांगितले. 

नदीपात्रातील सर्वच प्रकारचे अतिक्रमणे काढण्याची गरज. पक्षी अभयारण्यातील वृक्ष तोडणारे व वृक्षांना आग लावणाऱ्यांवर उद्यान विभागाने गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.
-समीर निकम, अध्यक्ष, क्‍लिन रिव्हर सोसायटी

नगर रस्त्यावर वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव असताना पक्षी अभयारण्यातून नवीन रस्त्याची आवश्‍यकता नाही. शहरात उद्याने, अभयारण्य ही जैवविविधता टिकली पाहिजेत.
- जावेद मुनसेफ, नॅशनल सोसायटी फॉर क्‍लिन सिटीज

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV Camera in Salim Ali Forest