CM Devendra Fadnavis
sakal
पुणे - पुण्यातील गणेशोत्सवात साऊंड सिस्टिमच्या भिंती पूर्णपणे हद्दपार करा, अशी मागणी नागरिक करत असताना त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. ‘पुणेकरांनी डीजेच्या वादात न पडता पुण्याचा सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा. एवढी क्षमता पुणेकरांमध्ये आहे,’ असे आवाहन फडणवीस यांनी केले.