उंड्री-पिसोळीमध्ये शाळाबाह्य मुलांना मिठाई वाटून बालदिन साजरा | Childrens Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंड्री-पिसोळीमध्ये शाळाबाह्य मुलांना मिठाई वाटून बालदिन साजरा

उंड्री-पिसोळीमध्ये शाळाबाह्य मुलांना मिठाई वाटून बालदिन साजरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री - शहर-उपनगर आणि परिसरात भंगार गोळा करणाऱ्या शाळाबाह्य व शिक्षणापासून वं​चित मुलांना मिठाई आणि फळे वाटप करण्यात आले. स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय, बाल स्वच्छता सप्ताह सुरू करीत उंड्री-पिसोळीमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी राजेंद्र भिंताडे यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुलांना फुगे देत आकाशात फुगे सोडून मुलांचा आनंद द्विगुणित केला. याप्रसंगी दादासाहेब कड, अविनाश टकले, ओंकार होले, शशिंकात पुणेकर, माऊली पुणेकर, विठ्ठल भिंताडे, सचिन भिंताडे, तुषार भिंताडे, विश्वास भिंताडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

भिंताडे यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा निश्चय केला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. बालदिन आणि स्वच्छता मोहिम यानिमित्त स्वच्छतेचा संदेश देणारी घोषवाक्ये म्हणण्यात आली. भविष्यात स्वच्छता आणि संतुलित आहार यांचे महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

loading image
go to top