यंदाची दहीहंडी वृक्ष लागवड करून गोविंदानी केली साजरी

डॉ. संदेश शहा
Wednesday, 12 August 2020

इंदापूर ( जि. पुणे ) येथील संकल्प प्रतिष्ठान च्या गोविंदानी यंदा कोरोना महामारीमुळे दहीहंडी महोत्सव रद्द झाल्याने पर्यावरण संतुलन तसेच हरित इंदापूर साठी 1200 विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले. प्रत्येक गोविंदाने यंदा 5 झाडे लावली असून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प देखील त्यांनी केला आहे. यंदाची दहीहंडी वृक्ष लागवड करून साजरा करण्याचा संकल्प यानिमित्त सर्व गोविंदानी केला.

इंदापूर -  इंदापूर ( जि. पुणे ) येथील संकल्प प्रतिष्ठान च्या गोविंदानी यंदा कोरोना महामारीमुळे दहीहंडी महोत्सव रद्द झाल्याने पर्यावरण संतुलन तसेच हरित इंदापूर साठी 1200 विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले. प्रत्येक गोविंदाने यंदा 5 झाडे लावली असून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प देखील त्यांनी केला आहे. यंदाची दहीहंडी वृक्ष लागवड करून साजरा करण्याचा संकल्प यानिमित्त सर्व गोविंदानी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी या उपक्रमात सहभागी होवूनवृक्षारोपण केले तर माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे यांनी वृक्षारोपण करून संकल्प प्रतिष्ठानचा गौरव केला. 

यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर व हरितकरण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर संकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य आहे. एकीकडे युवा पिढी मोबाईल च्या अधीन होत असताना प्रतिष्ठानच्या युवकांनी कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.

प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक अक्षय सूर्यवंशी म्हणाले, यंदा कोरोना महामारीमुळे सर्वत्र दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबविला असून इतर मंडळांनीदेखील पुढे येवून हा उपक्रम राबविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी इम्रान पठाण, प्रसाद भंडारी, आकीब शेख, यश भंडारी, सुरज महामुनी, सौरभ गायकवाड, प्रवीण अनपट, साहिल बागवान, किरण देवकर यांनी प्रयत्न केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate Govinda by planting this years tree plantation