
पुणे : आज २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून मित्र- मंडळींना केक भरवून शुभेच्छा दिल्या जातात.पुणे शहरात देखील विविध चर्च मध्ये आज मोठ्या उत्साहात ख्रिसमस हा सण उत्सहात साजरा केला जात आहे.मध्यरात्री पासून चर्च मध्ये विविध कार्यक्रम झाल्यावर आज सकाळपासून चर्चमध्ये विविध संस्कृती तसेच प्रार्थना च कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होत.पाहिलं मराठी ख्रिस्ती मंडळी असणारा पुण्यातील गुरुवार पेठेतील द चर्च ऑफ द होली नेम पवित्र नाम देवालय चर्च मध्ये देखील मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा करण्यात आलं आहे.