सासवड येथे सरदार गोदाजी जगताप यांचा शौर्य दिन साजरा

दत्ता भोंगळे
Tuesday, 11 August 2020

१० ऑगस्ट सोळाशे १६४८ रोजी किल्ले पुरंदर येथे झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईतील ऐतिहासिक विजयाच्या गौरवशाली इतिहासाला उजळा देण्यासाठी सासवड येथे गोदाजी राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

गराडे - १० ऑगस्ट सोळाशे १६४८ रोजी किल्ले पुरंदर येथे झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईतील ऐतिहासिक विजयाच्या गौरवशाली इतिहासाला उजळा देण्यासाठी सासवड येथे गोदाजी राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सासवड ( ता. पुरंदर ) येथे महापराक्रमी गोदाजीराजे जगताप यांच्या अर्ध पुतळ्यास आ. संजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सकाळी गोदाजीराजे यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या जवळ कर्नाटकातील बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकआप्पा जगताप, नगरसेवक नंदकुमार जगताप, राजाभाऊ जगताप, अजय जगताप, भूषण जगताप, गणेश जगताप, रमेश जगताप, संतोष जगताप, विजय जगताप, संजय चव्हाण, सुनील जगताप, स्वप्निल गायकवाड, अभिजित जगताप, दामूकाका जगताप, गुलाब जगताप, सागर जगताप आदी उपस्थित होते.     

पुरंदरच्या या ऐतिहासिक लढाईत आदिलशहा या बलाढ्य सरदाराचा वध करण्यात आला होता. या विजयामुळे स्वराज्यावरील मोठे संकट टळले. सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या शौर्याची गाथा पुढील पिढीला कळावी. यासाठी त्यांच्या शौर्याच्या व्याख्यानाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

सुनीलकाका जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर अनिल जगताप यांनी आभार मानले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebration of Sardar Godaji Jagtap day of bravery at Saswad