
एकीकडे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे पायाभरणीची धामधूम सुरू आहे. तर. दुसरीकडे आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी यांचे गाव मानले जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हेनगरीत घरोघरी गुढ्या उभारुन हा उत्सव साजरा केला जात आहे.
रामायण लिहिलेल्या वाल्मिकींच्या नगरीत असा सुरू आहे आनंदोत्सव
वाल्हे (पुणे) : एकीकडे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे पायाभरणीची धामधूम सुरू आहे. तर. दुसरीकडे आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी यांचे गाव मानले जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हेनगरीत घरोघरी गुढ्या उभारुन हा उत्सव साजरा केला जात आहे. तर काही ठिकाणी उत्साही भाविकांनी श्रीराम मंदिराची भव्य आकर्षक रंगबेरंगी रांगोळी रेखाटून आनंदोत्सव साजरा केला.
अयोध्येत आज (ता. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराच्या पायाभरणी पूजन झाले. शेकडो वर्षाचे श्रीराम मंदिराचं स्वप्न आज सत्यात उतरत असल्याने या एतिहासिक दिवसाचे औचित्य साधत आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकींचे समाधीस्थळ असलेल्या पुरंदर तालुक्यातील वाल्हेनगरीत रामभक्तांनी घरोघरी गुढ्या उभारुन उत्सव साजरा केली. रामभक्तांनी शासकीय नियमांचे पालन करीत घरोघरी जाऊन प्रसादाचे वाटप केले. त्यामुळे वाल्मिकनगरी राममय झाल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याच भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते व शिवसेनचे युवा नेते सागर भुजबळ यांनी सांगितले.
पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला
अयोध्यानगरीमध्ये श्रीराम मंदिराचं स्वप्न आज शेकडो वर्षाने साकारत होत असलेले पायापजन संपुर्ण देशभऱासाठी हा एक उत्सव आहे. विशेषत: आमचे गाव रामायणकार महर्षि वाल्मिकींची पुण्यभूमी असल्याने अधिक उत्साह आहे. यानिमित्त येथील ग्रामस्थांनी घरोघरी गुढ्या उभारुन आनंदोत्सव साजरा केल्याने वाल्मिकनगरी राममय झाली, असे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांनी सांगितले.