esakal | केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, दोन ठिकाणी छापेमारी
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, दोन ठिकाणी छापेमारी

केंद्रीय यंत्रणाच्या रडारावर बारामती, दोन ठिकाणी छापेमारी

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती - शहरातील एमआयडीसीतील एक बडी कंपनी तसेच तालुक्यातील काटेवाडी येथील एका व्यक्तीच्या घराची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.

बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय यंत्रणांच्या पथकांनी आज, गुरुवारी सकाळीच शोधमोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिका-यांची भेटही होऊ न शकल्याने नेमकी ही शोधमोहिम कशासाठी सुरु आहे हेही निष्पन्न झालेले नाही. एका खासगी साखर कारखान्याशी संबंधित एका पदाधिका-याच्या घराबाहेरही हे अधिकारी ठाण मांडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी या बाबत नेमका खुलासा झालेला नाही.

पोलिसांनाही या छापेमारीबाबत फारशी कल्पना नसल्याचे पुढे आले आहे. बारामतीत काल किरीट सोमय्या येऊन गेल्यानंतर आज लगेचच छापेमारी सुरु झाल्यानंतर याला काही राजकीय संदर्भ आहेत किंवा कसे या बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

loading image
go to top