Pune Traffic : सेंट्रल चौकाआधी, कोंडीच्या कल्पनेनेच थरकाप; वाहन पुढे सरकताना सत्त्वपरीक्षा, मोकळा चौक तर लॉटरीच
PCMC News : जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सेंट्रल चौक व कात्रज बायपास येथे दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मानसिक आणि वेळेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिरगाव : जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड सेंट्रल चौक आणि कात्रज बायपास परिसर येथे रोजच वाहतूक कोंडी होते. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी हा चौक काही मीटर अंतरावर येताच कोंडीच्या नुसत्या कल्पनेने थरकाप उडतो.