Pune : अमित शहांचा पुणे दौरा रद्द; शहराध्यक्षांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

Pune : अमित शहांचा पुणे दौरा रद्द; शहराध्यक्षांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा असल्याने गेले दोन दिवस राजकीय घडामोडींना वेग आला होता. मात्र, आता २६ नोव्हेंबर रोजीचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याने हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही माहिती दिली.

अमित शाहा हे २६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील वैकुंठ मेहता इंस्टिट्यूटला भेट देणार होते. त्यानंतर महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार होते. तर गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यकर्ता मेळाव्यात शहा संबोधित करणार होते.

या कार्यक्रमामुळे भाजपकडून महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला जाणार असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे या दौऱ्यावर विरोधकांनी देखील टीका केली. भाजपकडून दौर्याची तयारी सुरू असताना हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

loading image
go to top