पोस्टाने पाठवा हयातीचा दाखला; पेन्शनधारकांना मिळाला दिलासा 

india post
india post

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरगावी असलेल्या पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे आता तेथील राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेला विशिष्ट नमुन्यातील हयातीचा दाखला पोस्टाने पाठविला तरी तो स्वीकारला जाणार आहे. यामुळे पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

पेन्शनधारकांना हयातीचा दाखला दरवर्षी एक ते ३० नोव्हेंबर या कालावधीत निवृत्तिवेतन अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो. पेन्शनधारक ज्या बॅंकेतून निवृत्ती वेतन घेतात, त्या बॅंकेकडून कोषागार कार्यालयात हयातीचा दाखला सादर केला जातो. सरकारने हयातीचा दाखला सादर करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. 

दरम्यान, काही निवृत्तिवेतनधारक बाहेरगावी मुला-मुलींकडे स्थायिक झालेले असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ज्येष्ठ व्यक्‍तींना प्रवास करण्यास निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बॅंकेत, पोस्टात किंवा कोषागार कार्यालयात जाणे शक्‍य होत नाही. त्यामुळे कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याकडून हयातीचा दाखला पोस्टाने पाठविल्यास तो स्वीकारला जाणार आहे.

याबाबत पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर शेटे म्हणाले, ‘‘हयातीचा दाखला सादर करण्याची तारीख ३१ डिसेंबर आहे. कोरोनामुळे ज्या निवृत्ती वेतनधारकांना बॅंकेत किंवा कोषागार कार्यालयात जाणे शक्‍य नाही, त्यांनी राजपत्रित अधिकाऱ्याकडून हयातीचा दाखला घेऊन तो पोस्टाने संबंधित कार्यालयात पाठवावा. तो हयातीचा दाखला स्वीकारण्यात येईल.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइनही सुविधा
हयात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी ऑनलाइन सुविधाही सुरू आहे. पेन्शनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) मिळविण्यासाठी आयडी तयार करावा लागेल. आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकच्या माध्यमातून आयडी तयार करता येईल. पहिल्यांदा आयडी तयार करण्यासाठी आधार सेवा केंद्र किंवा त्या संकेतस्थळावर जावे लागेल. आधार, मोबाईल क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) क्रमांक आणि पेन्शन खात्यासह बोटाचा ठसा दिल्यास मोबाईलवर संदेश येईल. त्यात आयडीसंबंधी माहिती असेल. आयडी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जीवन प्रमाण पोर्टलवर https://jeevanpramaan.gov.in ऑनलाइन सबमिट करता येईल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास किंवा प्रवासावर निर्बंध घातले आहेत. तसेच, बाहेर पडणे शक्‍यही नाही. अशा परिस्थितीत राजपत्रित अधिकाऱ्याकडून घेतलेला हयातीचा दाखला संबंधित कार्यालय किंवा बॅंकेने पोस्टाद्वारे स्वीकारल्यास पेन्शनधारकांना निश्‍चितच दिलासा मिळणार आहे. 
- शकुंतला सोनवणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com