
CET 2025
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : राज्यातील विविध समाजातील विद्यार्थिहितासाठी कार्यरत असलेल्या ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘आर्टी’, ‘टीआरटीआय’ आणि ‘महाज्योती’ यांसारख्या स्वायत्त संस्थांच्या ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. या संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी)-२०२५साठी विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेले परीक्षा केंद्र न देता, ३०० ते ४०० किलोमीटर दूर असलेली परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आमच्या भविष्याशी खेळ चाललेला असल्याची संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.