सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CET-Exam
CET-Exam
Updated on: 

पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय आणि ललित कला आर्ट या अभ्यासक्रमांच्या १८ परीक्षांचा समावेश आहे. 

तंत्रशिक्षण विभागात अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान (बीई/ बीटेक), औषधनिर्माण, कृषी संबंधित अभ्यासक्रम, दुग्धशाळा तंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा येत्या १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत होणार आहे. एमबीए आणि एमएमएस पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १४ आणि १५ मार्च, मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) २८ मार्च, मास्टर इन आर्किटेक्‍टर १० मे, हॉटेल मॅनेजमेंट (पदवी) १० मे आणि हॉटेल मॅनेजमेंटची (पदव्युत्तर) प्रवेश परीक्षा १६ मे रोजी होणार आहे.

उच्च शिक्षण विभागांतर्गत एलएलबीसाठी (पदवी - ५ वर्ष) प्रवेश परीक्षा १२ एप्रिल, एलएलबी (पदवी ३ वर्ष) २८ जून, शारीरिक शिक्षण (बी.पी.एड. पदवी) ११ मे आणि मैदानावरील चाचणी १२ व १३ मे, बीएड आणि एमएड (इंटिग्रेटेड ३ वर्ष) १२ मे, शारीरिक शिक्षण (एमएड पदव्युत्तर) १४ मे आणि मैदानावरील चाचणी १५ आणि १६ मे, बीए/बीएस्सी बीएड (इंटिग्रेटेड ४ वर्ष) २० मे, मास्टर इन एज्युकेशन (एमएड) २६ मे आणि बॅचलर ऑफ एज्युकेशनसाठी (जनरल अँड स्पेशल) १३ जून आणि १४ जून रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. 

वैद्यकीय शिक्षणामध्ये मास्टर ऑफ फिजिओथेरपी, ॲक्‍युपेशनल थेरपी, ऑडिओ स्पीच लॅंग्वेज पॉथोलॉजी, प्रोस्थेटिक्‍स अँड ऑथ्रोटिक्‍ससाठी येत्या जुलै- ऑगस्ट प्रवेश परीक्षा होणार आहे. ललित कला (फाईन आर्ट) पदवी अभ्यासक्रमासाठी १० मे रोजी प्रॅक्‍टिकल आणि ११ मे रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. 

या ठिकाणी पाहा वेळापत्रक
‘सीईटी’ सेलतर्फे या प्रवेश परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आणि परीक्षेसंदर्भातील सूचना, माहिती पुस्तिका, प्रवेश अर्ज, प्रवेश नियम, शासन निर्णय आदींबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. www.mahacet.org  या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध केली असल्याचे संदीप कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com