पुणे : ट्रॅक्‍टरची ट्रॉली अंगावर पडून चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

राडारोडा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या चालकाचे तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्यानंतर रस्त्यावरील दगडावरुन ट्रॅक्‍टर उलटून ट्रॉलीखाली आल्याने ट्रॅक्‍टरचालकाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येवलेवाडीतील धांडेकर खाणीजवळ घडली. 

पुणे : राडारोडा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या चालकाचे तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्यानंतर रस्त्यावरील दगडावरुन ट्रॅक्‍टर उलटून ट्रॉलीखाली आल्याने ट्रॅक्‍टरचालकाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येवलेवाडीतील धांडेकर खाणीजवळ घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय, 40, रा. येवलेवाडी) असे अपघातात मृत्यु झालेल्या चालकाचे नाव आहे. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे त्यांच्या ट्रॅक्‍टरमध्ये भवानी पेठ येथून राडारोडा उचलून तो येवलेवाडी परिसरातील एका खाणीमध्ये टाकण्यासाठी गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जात होते.

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

कोंढव्यातील खडी मशीनपासून पुढे धांडेकर खाणीकडे जात असताना तीव्र उतारामुळे गायकवाड यांचे ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दोन दगडांवर ट्रॅक्‍टरचे पुढील चाक गेल्याने ट्रॅक्‍टर उलटला. तेव्हा गायकवाड हेदेखील ट्रॅक्‍टरवरुन खाली कोसळले. त्याचवेळी ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील बाजुस असणारी ट्रॉली त्यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. याबाबतची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गायवाड यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died in tractor accident in yewalewadi pune