मोठी बातमी : सीईटीच्या परीक्षांबाबत उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा

This is important information given by Uday Samant about CET exams
This is important information given by Uday Samant about CET exams

पुणे : उच्च व तंत्रशिक्षणाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या प्रवेश परीक्षा (सीईटी) कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढच्या १५ दिवसांनी पुन्हा आढावा घेऊन परीक्षांची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे एप्रिल महिन्यात होणारी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होती. याच काळात अकृषी विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. या परीक्षांचे नियोजन करताना सीईटी सेलनेही नियोजन सुरू केले होते. त्यानुसार ४ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत सीईटीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आज पुन्हा एकदा तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. 

पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट

याबाबत माहिती देताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. " महाराष्ट सीईटी च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. कोवीड १९ चा वाढता प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. उच्च शिक्षणासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी या प्रवेश परीक्षा होणे आवश्यक आहे. यासाठी पुढील १५ दिवसांनी आढावा घेऊम नवीन तारखा भविष्यात सांगण्यात येतील. विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवावा. 
अर्सेनिक अल्बम-30 वापटला स्थगिती मागत होते; कोर्टाने घेतला मोठा निर्णय
दरम्यान राज्य सीईटी सेलतर्फे"एमएचटी-सीईटी' परीक्षा ४ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याचे सीईटी सेलने १९ मे रोजी जाहीर केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com