म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निरोप देण्यासाठी छगन भुजबळ पोहोचले !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

पुण्यातील सरकारी कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी यांना निरोप देताना हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु भुजबळ हे राज्य सरकाचे प्रतिनिधी या नात्याने पंतप्रधान मोदी यांना निरोप देण्यासाठी उपस्थित राहील्याचे भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

पुणे : पुण्यातील सरकारी कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी यांना निरोप देताना हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु भुजबळ हे राज्य सरकाचे प्रतिनिधी या नात्याने पंतप्रधान मोदी यांना निरोप देण्यासाठी उपस्थित राहील्याचे भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिस महासंचालक परिषदेचा समारोप करुन रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. त्यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल भगतसिंग कोशियारी, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधीर मोहोळ, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल, पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी उपस्थिती लावली. मात्र छगन भुजबळ हेदेखील मोदी यांना निरोप देण्यासाठी उपस्थित राहील्याने त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

महाराष्ट्रातील मोठ्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर शुक्रवारी त्यांचे स्वागत केले. राजशिष्टाचारानुसार ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थिती लावली. परंतु पंतप्रधान मोदी दिल्लीला जाताना छगन भुजबळ कसे ? असा प्रश्‍न अनेकांनी उपस्थित केला. भुजबळ हे त्यांच्या वैयक्तीक कार्यक्रमानिमित्त रविवारी पुण्यात आले होते. तसेच ते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्री आहेत. त्यांनी सरकारचे प्रतिनिधी या नात्याने मोदी यांना निरोप देण्यासाठी उपस्थित राहीले. तेथून ते विमानाने मुंबईला व मुंबईहून तत्काळ नाशिक गेले असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chagan Bhujbal presence at Pune airport to PM Narendra Modis Goodbye