Chakan Trafficsakal
पुणे
Chakan News : चाकण बाह्यवळण मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया ऑक्टोंबर महिन्यातच सुरु होणार
पुणे-नाशिक महामार्ग, चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर मार्ग हा वाहतूक कोंडीमय आहे. या मार्गाची नव्याने कामे होणे गरजेचे आहे.
चाकण - येथील चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेला चाकणचा बाह्यवळण मार्ग कडाचीवाडी ते मेदनकरवाडी, नाणेकरवाडी ते खराबवाडी औद्योगिक वसाहत असा साधारणपणे साडेचार किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया ऑक्टोंबर मध्येच सुरु होईल असे पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

