Chakan News : चाकणमध्ये महामार्गावरून दररोज हजारो कंटेनर-ट्रेलरची वाहतूक; नवले पूल दुर्घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका!

Container Traffic : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण कंटेनर दुर्घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असताना चाकण परिसरातही अशीच दुर्घटना कधीही घडू शकते, अशी भीती नागरिक आणि कामगार व्यक्त करत आहेत.
Risk of Accidents Similar to Navale Bridge Incident ata Chakan

Risk of Accidents Similar to Navale Bridge Incident ata Chakan

Sakal

Updated on

चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील अनियंत्रित कंटेनर व ट्रेलर वाहतूक दिवसेंदिवस मृत्यूचे सावट बनत आहे. चाकण परिसरातून दररोज तब्बल ५० हजारांहून अधिक कंटेनर, ट्रेलर, टँकर यांची वर्दळ सुरू असते. त्यापैकी अनेक जण भरधाव वेगात, नियम धाब्यावर बसवून, तर काही चालक मद्यप्राशन करून जीवघेणी वाहतूक करतात. परिणाम सातत्याने अपघात आणि निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. नवले पुलावरील दुर्घटनेत जसा कंटेनर अनियंत्रित होऊन अनेक वाहने चिरडली, तसाच थरार चाकण-शिक्रापूर तसेच चाकण-तळेगाव मार्गावर पाहायला मिळतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com