
चाकण : येथील पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, चाकण-आंबेठाण मार्गावर शनिवारी (ता. ८) दिवसभर झालेल्या वाहतूक कोंडीने प्रवासी अक्षरशः घायकुतीला आले होते. महामार्गावर दोन, तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अगदी एक किलोमीटरसाठी एक ते दीड तास लागत होते. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गाने प्रवास नकोरे बाबा, अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली होती.