

Chakan Industrial Growth Gets Boost as Eknath Shinde Addresses Entrepreneurs Concerns and Infrastructure Challenges
esakal
-हरिदास कड
चाकण: चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची तसेच दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बैठकीत सांगितले.