
आंबेठाण : चाकण भागात एमआयडीसी आल्याने राज्यासह देशातील हजारो हातांना काम मिळाले.त्यातून अनेकांचे प्रपंच स्थिर तर झाले पण त्याबरोबर अवैध धंद्यानी देखील आपले बस्तान बसविले आहे.या अवैध धंदे चालकांची दादागिरी मोठ्या प्रमाणत वाढली असून परप्रांतीय कामगारांना मारहाण करून लुटण्याचे प्रकार सर्रासपणे पहायला मिळत आहे.