election
sakal
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या रणधुमाळीचा ज्वर अंतिम चरणात असून आक्रमक प्रचारामुळे राजकीय ‘दंगल’ अनुभवायला येत आहे. पक्षांचे कार्यकर्ते रोड शो, सभा आणि घोषणांमधून आपली ताकद दाखवत आहेत. तर काही ठिकाणी प्रचंड सभा आणि ‘घर ते घर’ प्रचार यामुळे परिसर गजबजला आहे. उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभनांचे वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत.