
Chakan Protest
Sakal
पिंपरी/चाकण : ‘‘चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासह इतर पायाभूत सुविधांची कामे करत असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सांगत आहे. शेकडो, हजारो कोटींची कामे सुरू असल्याचा दावा केला जातो. तरीही वाहतूक कोंडी आणि इतर समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आता आश्वासन नको, तर कामे दाखवा,’’ असा पवित्रा घेत ‘ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती’ने गुरुवारी (ता. ९) आकुर्डी येथील ‘पीएमआरडीए’ कार्यालयावर मोर्चा काढला.