

Uday Samant Visit Triggers Action On Chakan Talegaon Road Potholes After Months Of Neglect And Complaints From Citizens
Sakal
चाकण : उद्योगमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असलेल्या चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे शनिवारी (ता. १५) रात्रीच्या अंधारात बुजवण्यात आले असून, परिसरातील कचराही उचलण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या नेहमीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.