Chakan Traffic Jam : चाकणला वाहनांच्या चार किलोमीटर रांगा, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचे ग्रहण काही सुटेना
Traffic Alert : चाकण परिसरात शनिवारी पहाटेपासून झालेल्या वाहतूक कोंडीत हजारो वाहनं अडकली असून पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.
चाकण : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण परिसरात शनिवारी (ता.२७) पहाटे साडेसहा ते सकाळी सात वाजेदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.