Pune-Nashik Highway : चाकण परिसरात बेकायदेशीर रिक्षांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून प्रशासनाकडून कारवाईची मागणी होत आहे.
चाकण : चाकण (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्ग चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर रिक्षाचालक अवैधरीत्या रिक्षा चालवून त्यांच्या आडमुठेपणामुळे व दादागिरीमुळे वाहतूक कोंडी होत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.