

Illegal Construction Demolished in Chakan as Authorities Launch Biggest Action Yet Against Unauthorized Structures
sakal
चाकण : खेड तालुक्यातील चाकण नगर परिषदेने शहराच्या इतिहासात प्रथमच अनधिकृत बांधकामांवर सर्वांत मोठी धडक कारवाई केली. बुधवारी (ता. ९) मोठ्या पोलिस बंदोबस्तात तीन बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, शहराच्या नियोजनाला खीळ घालणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक निर्माण झाला आहे.