esakal | पिंपरीत सिंधी बांधवांच्या "चालिहो' उत्सवाची सांगता 
sakal

बोलून बातमी शोधा

chaliho festival end in pimpri

पिंपरीत सिंधी बांधवांच्या "चालिहो' उत्सवाची सांगता 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी  : तब्बल 40 दिवसांच्या कडक उपवासानंतर सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाची रविवारी (ता.25) सांगता झाली. यानिमित्त पिंपरीत पवनेच्या काठावर भाविकांनी गर्दी केली होती. कणकेचा पंचमुखी दिवा म्हणजेच "बैराना' नदीमध्ये सोडण्यात आला. 

शहरात चाळीस दिवसांपासून हा उत्सव सुरू होता. दरवर्षीप्रमाणे बाबा छतुराम झूलेलाल मंदिरात 40 दिवसांसाठी ज्योत प्रज्वलित करून ठेवण्यात आली होती. त्या ज्योतीच्या दर्शनासाठी सिंधी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. या चाळीस दिवसांत मंदिरात भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सिंधी बांधवांनी 40 दिवस उपवास केला. 

या काळात आपण केलेल्या पापांची कबुलीही दिली जाते. या काळात मांसाहार व मद्यप्राशन केले जात नाही. या उत्सवानिमित्त पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेतून नदीकाठावरील झूलेलाल मंदिरापर्यंत सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. काही भाविकांनी अन्नदान केले. शेकडो दीपज्योती पवना नदीपात्रात सोडण्यात आल्या. 
 

loading image
go to top