खुटबाव - नंदादेवी (ता. दौंड) येथील शेतकरी संतोष बापूराव कोकणे यांच्या काजळी खिलार या जातीच्या सोन्या-मोन्या बैलजोडीची महाराष्ट्रभर कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे. मालकाच्या आज्ञेनुसार सोन्या-मोन्या कृती करत असल्याने या जोडीचा भाव चांगलाच वधारला आहे.