Cold in Pune : पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cold

उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे पुण्यातील थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Cold in Pune : पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता

पुणे - उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे पुण्यातील थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी शिवाजीनगर येथे १४.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती आहे. राज्यातही बुधवारी किमान तापमान १२ ते २२ अंशांच्या दरम्यान होते. उत्तरेकडील थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

परिणामी राज्यातही किमान तापमानात घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे. शहरात आकाश निरभ्र राहून, कोरड्या हवामानासह, किमान तापमानात किंचीत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :puneCold