राज्यात पाऊसाची शक्यता: हलक्या सरींसह कोसळणार गारांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

दक्षिण मध्य महाराष्ट्र व नजीकच्या राज्यात (कर्नाटक) चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर दक्षिण तामिळनाडूच्या दिशेने उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाऱ्यांचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामध्ये काही प्रमाणात आद्रता आहे. येत्या शुक्रवारपर्यंत चक्राकार वारे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील वाऱ्यांचे कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात प्रवेश करत असताना सोबत मोठ्या प्रमाणात आद्रता आणतील.

पुणे : पुणे जिल्ह्यात उद्यापासून पावसाच्या हलक्या सरी व काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याच बरोबर पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह विदर्भात काही ठिकाणी विजांचयस कडकडात हलका पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
दक्षिण मध्य महाराष्ट्र व नजीकच्या राज्यात (कर्नाटक) चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. त्याचबरोबर दक्षिण तामिळनाडूच्या दिशेने उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाऱ्यांचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामध्ये काही प्रमाणात आद्रता आहे. येत्या शुक्रवारपर्यंत चक्राकार वारे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील वाऱ्यांचे कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात प्रवेश करत असताना सोबत मोठ्या प्रमाणात आद्रता आणतील. परिणामी बुधवारी (ता. 25) पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस आणि मुबंई मध्ये पावसाच्या हलक्या सारी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याच बरोबर अहमदनगर, सोलापूर सातारा, सांगली व कोल्हापूरच्या काही भागात गारांचा पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
htra
Corona Virus : पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याचे रिपोर्ट निगेटिव्ह; पुणेकरांना दिलासा!
पकिस्तांच्या दिशेनी पाश्चात्य विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) सुद्धा राज्यात प्रवेश करणार असून ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच राहणार असल्याचे माहिती हवामान विभागामार्फत देण्यात आली.

Corona Virus : खासगी रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांची होणार कोरोना तपासणी

"चक्राकार वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण करणाऱ्या वाऱ्यांमध्ये आद्रताचे प्रमाण जास्त असल्याने हा गारांचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर पाकिस्तानचा दिशेनी पुढील तीन दिवस म्हणजेच शनिवार पर्यंत ही स्थिती अशीच राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , कोंकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस व गारपीट पडण्याची शक्यता आहे."
- अनुपम काशयपी, हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of Rainfall in the Maharashtra