
पुण्याच्या दक्षिण भागात आकाशात दाट ढग साचले असून येथे पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
पुण्यासह नाशिक, धुळे, सोलापूर, नंदूरबार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. तर पुण्याच्या दक्षिण भागात आकाशात दाट ढग साचले असून येथे पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात बदल जाणवत असून दिवसभरात उकाडा तर रात्रीच्या वेळेत थंडी जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर आज वेधशाळेनं पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे कोकणतील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला असून आंब्याचा मोहोर येत असताना पावसामुळे त्याला फटका बसण्याची शक्यता आहे.
कोकणात पावसाची एन्ट्री; बागायतदार चिंतेत
राज्यात करोनाच्या संसर्गाने पुन्हा वेग घेतल्याने वातावरणातील या बदलामुळे नागरिकांनी तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लॉकडाउन बऱ्यापैकी शिथील झाल्याने नागरिकांनी आता सर्वकाही पूर्वरत झाल्याप्रमाणे कोविड-19च्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच करोनाच्या संख्येत वाढ झाल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.