कोकणात पावसाची एंट्री ; बागायतदार चिंतेत

प्रमोद हर्डीकर
Thursday, 18 February 2021

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार संगमेश्वर तालुक्यात पहाटे तीन वाजल्यापासुन जोरदार पाऊस झाला

साडवली : वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार संगमेश्वर तालुक्यात पहाटे तीन वाजल्यापासुन जोरदार पाऊस झाला. सलग दीड तास हा पाउस पडला.रत्नागिरी जिल्ह्यात ढगांचा गडगडाट व वीजेचा लखलखाटासह हा पाऊस कोसळला. 

बुधवारी सकाळी सर्वत्र दाट धुके पसरले होते व दुपारी उष्मा वाढला होता. दिवसभर वातावरण चांगले होते.पहाटे अचानक ढगांचा गडगडाट सुरु होवुन तीन वाजता पावसाच्या सरी कोसळल्या.सुमारे एक तास हा पाऊस सुरु होता.अचानक आलेल्या या पावसाने बागायतदार माञ चिंतेत पडले आहेत.

 

हेही वाचा- ब्रेकिंग : महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

हेही वाचा-जुन्या कपड्यांना द्या नवा लुक  या पाच पद्धतीने

 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain fell in Sangameshwar taluka from 3 am kokan marathi news