Pune’s Chandan Nagar murder case: five arrested, minor detained in love affair dispute.
पुणे : चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात प्रेमसंबंधातील वादातून तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे. लखन बाळू सकट (वय १८, रा. चंदननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लखनचा काका केशव बबन वाघमारे (वय ३२) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.