Pune : चांदणी चौकातील पूल आज कोसळणार; तत्पूर्वी पुणेकरांसाठी सूचनांचा महापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandani Chowk

Pune : चांदणी चौकातील पूल आज कोसळणार; तत्पूर्वी पुणेकरांसाठी सूचनांचा महापूर

Chandani Chowk Bridge News : पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूल अखेर आज मध्यरात्री पाडला जाणार आहे. त्याआधीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, पूल पाडण्यासाठी आज रात्री अकरा वाजल्यापासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्या आली आहे. आता हा पूल पुण्यात पाडला जाणाऱ असल्याने आणि पुण्यात घडणाऱ्या गोष्टींची चर्चा ही होतीच त्याप्रमाणे याचीदेखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एवढचे काय यासाठी सोशळ मीडियावर सूचनांचा महापूर सुरू झाला आहे. अशाच काही सूचना खास वाचकांसाठी....

हेही वाचा: Fact Check : चांदणी चौकातील पूल पडल्यावर वाहतुकीचे नियोजन 'व्हायरल', अधिकाऱ्यांचं उत्तर

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सूचना

येत्या शनिवारी म्हणजेच आज रात्री आणि रविवारी सकाळी पुणेकरांसाठी अभूतपूर्व असा क्षण आहे. पश्चिमेकडील प्रवेशद्वार असे ओळख असलेला चांदणी चौकातील पुल पडणार आहे. त्यासाठी शनिवारी रात्रीपासूनच महामार्ग बंद असेल आणि सगळी वाहतूक पुणे शहरातून वळवली जाईल. रविवारी संपूर्ण शहरभर ट्रॅफिक असेल.

हेही वाचा: Chandani Chowk : ट्वीन टॉवर जमीनदोस्त करणारी कंपनी 10 सेकंदात पाडणार पुण्यातील पूल

१) तरी गरज असेल तरच बाहेर पडा.

२) पाडायचे काम आधीच कोणाला तरी दिले आहे. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून उगीच गर्दी करू नका.

३) पहिले दृष्य आपल्याच कॅमेरामध्ये येईल याची काळजी घेताना आपला फोटो भिंतीवर येणार नाही याची पण काळजी घ्या.

४) बघ्यांची गर्दी वाढवून पोलीस आणि शासकीय यंत्रणांवरील भार अजून वाढवू नका.

5) तिथे जुन्या काळी कुठले हे युद्ध झाले नाही किंवा वाडा नव्हता, त्यामुळे नंतरसुद्धा काही मिळणार नाही याची नोंद घ्या.

हेही वाचा: Nitin Gadkari : पुणेकर वाहतूक कोंडीत अन् गडकरींकडून चांदणी चौकाची हवाई पाहणी

वरील सूचना सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत असून, मध्यरात्री पूल पाडला जाणार असल्याने आणि ही सर्व घडामोड पुण्यात होत असल्याने त्याची चर्चा आणि नोंद होणार नाही असं कधीच होणार नाही. पूल पाडण्याआधी सूचनांचा असा महापूर आहे, तर पूल पाडल्यानंतर पुणेकर आणखी किती दिवस त्यावर चर्चांचे फड रंगवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.