Chandani Chowk : चांदणी चौक बनला सेल्फी पॉइंट

पुण्याचे पश्चिमेकडील महाप्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामामुळे या चौकाला नवी झळाळी मिळाली आहे.
Chandani Chowk
Chandani ChowkSakal

बावधन - पुण्याचे पश्चिमेकडील महाप्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामामुळे या चौकाला नवी झळाळी मिळाली आहे. एनडीएच्या बाजूला असलेल्या वर्तुळात उभारलेल्या लढाऊ विमान, नौका आणि रणगाड्याच्या प्रतिकृतीमुळे चांदणी चौक सध्या ऐतिहासिक ठिकाण आणि सेल्फी पॉइंट बनला आहे. सध्या पुणेकरांची येथे दररोज गर्दी होत आहे.

चांदणी चौकातून कोकण, सातारा, मुंबई आणि पुण्याकडे ये-जा करता येते. त्यामुळे हा चौक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा चौक आहे. गतवर्षी येथील जुना पूल पाडून त्याचे नूतनीकरण करण्यात आले. चारही मार्गाला ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्त्याचे जाळे तयार करण्यात आले.

रस्त्याच्या खांबावर, भिंतीवर आकर्षक चित्रांची रंगरंगोटी केली गेली. या चौकात एनडीए आणि बावधन या दोन्ही बाजूला वर्तुळाकृती बांधकाम करण्यात आले. एनडीए बाजूकडील वर्तुळात लढाऊ विमान, जहाज आणि रणगाड्याच्या प्रतिकृती उभारल्या.

चोहोबाजूला तिरंगा ध्वजाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. लढाऊ नौका, विमान, रणगाड्यामुळे हे ठिकाणी म्हणजे ऐतिहासिक स्मृतीस्थळच तयार झाले आहे. त्यामुळे चांदणी चौक पाहण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी होत आहे.

चौकातील प्रतिकृती पाहताना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास समोर उभा राहतो. त्यामुळे पुढील पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याच्या इतिहासाचे नेहमी स्मरण होऊन देशाभिमान जागृत होईल.

- शीला सातपुते, कोथरूड

लहान मुलांसाठी हे प्रेरणादायी स्थळ आहे. येथील लढाऊ नौका, विमान आणि रणगाड्यामुळे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आहुती देणाऱ्या देशभक्तांची आठवण होते.

- प्रदीप कपिले, नांदेड सिटी

चौकाच्या नूतनीकरणामुळे बावधनच्या वैभवात भर पडली आहे. प्रत्येकासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने वाहतूक कोंडीतूनही आता सुटका होणार आहे.

- पांडुरंग दगडे, बावधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com