esakal | चंदननगर : आलो देवाच्या दारी. दर्शनासाठी मंदिरे खुली
sakal

बोलून बातमी शोधा

आलो देवाच्या दारी

चंदननगर : आलो देवाच्या दारी ! दर्शनासाठी मंदिरे खुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंदननगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणुन राज्य सरकार कडून मंदिरे बंद ठेवण्यात आले होते. आज शारदीय नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शासनाच्या आदेशानुसार मंदिरे सुरू करण्यात आले. भाविकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत देवी देवतांचे दर्शन घेतले.

चंदननगर येथील साई मंदिरा बाहेर भाविक हात सॅनिटायझर करून मंदिरात दर्शनासाठी येत होत. त्यावेळी तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतर याचे काटेकोरपणे भाविकां कडून पालन केले जात होते.

चंदननगर येथील साई मंदिर

चंदननगर येथील साई मंदिर

हेही वाचा: वाघोलीतील वाघेश्वर मंदिर सकाळी सहा वाजल्यापासूनन दर्शनासाठी खुले

वडगावशेरी येथील गणेश मंदिरात कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट कडून भाविकां साठी कोरोनाच्या नियमांचे सुचना फलक लावण्यात आले आहे .भाविकां कडून नियम पाळून देव दर्शन घेतले जात होते.

वडगावशेरी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधीं योगेश मुळीक यांच्या हस्ते देवतांची आरती करण्यात आली. तब्बल अठरा महिन्याने मंदिरे सुरू करण्यात आल्याने भाविकां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. ताल मृदुंगाचा गजर मंदिरा बाहेर रांगोळी, फुलांचे तोरण अशा सुंदर व भक्तिमय वातावरणात देवाचे दर्शन झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता.

loading image
go to top