Video : अवघ्या ६ सेकंदात जमीनदोस्त होणार चांदणी चौकातील पूल, कसा? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandni Chowk bridge will be demolished in just six seconds pune News

Video : अवघ्या ६ सेकंदात जमीनदोस्त होणार चांदणी चौकातील पूल, कसा? जाणून घ्या

Chandni Chowk Bridge Demolition : आज रात्री पुण्यातील वाहतूकीला अडचणीचा ठरणार चांदणी चौकातील पूल अखेर पाडण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने चांगलीच खबरदारी घेतली असून पूल पाडताना गर्दी होऊ नये म्हणून चांदणी चौक परिसरात रात्री अकरा (शनिवार) पासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कोणताही अपघात घडू नये म्हणून प्रशासनाकडून जमावबंदी करण्यात आली आहे.

गेल्या महिनाभरापासून चर्चेत असणारा हा पूल रात्री दोन वाजता पाडण्यात येणार आहे. नोयडातील ट्विन टावर पाडणाऱ्या कंपनीलाच हा पुण्यातील पुल पाडण्याचा कंत्राट देण्यात आले आहे.

अवघ्या ६ सेकंदात पाडला जाईल पूल

पुण्यातील चांदणी चौकातील पूल अवघ्या ६ सेकंदात पाडला जाणार आहे, यासाठी कंट्रोल ब्लास्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी खास एक्सप्लोडर आण्यात आले असून उरळी कांचनचे वेंकटेश महाडिक हे ब्लास्ट करणार आहेत. गेल्या २२ वर्षांपासून महाडिक हे एक्सप्लोडर ऑपरेटर म्हणून काम करत आहेत.

एक्सप्लोडर ऑपरेटर महाडीक यांनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर एक्सप्लोजिव्ह जोडून ठेवण्यात आले आहेत त्यानंतर रात्री पावणे दोन वाजता ईडी जोडण्यात येईल, त्यानंतर वायर सेफ्टी रुमपर्यंत आणली जाईल. त्या वायर्स एक्सप्लोडरला जॉईन केला जाईल. त्यानंतर एक्सप्लोडर चार्ज केला जातो. त्यानंतर सर्व गोष्टींची खात्री झाल्यानंतर ब्लास्ट केला जातो.

हेही वाचा: Chandni Chowk Bridge Demolition Live: चांदणी चौकातील पूल होणार इतिहासजमा; काउंटडाऊन सुरू

हेही वाचा: Pune News : 'या' 9 कारणांसाठी चांदणी चौकातील पुलाला धन्यवाद म्हटलंच पाहिजे

चांदणी चौक परिसरातील वाहतूक बंद

चांदणी चौक पूल पाडण्यासाठी पुणेकरांनी गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या परिसरात कलम 144 देखील लागू असून पोलीस कर्मचाऱ्यांसह रॅपिडक्शन फोर्स देखील तैनात करण्यात आली आहे. दरम्यान रात्री एक ते दोन दरम्यान चांदणी चौक पाडण्यात येणार असून संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला जात आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला गेला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे.

टॅग्स :Pune NewsChandni Chowk