

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Sakal
पुणे : ‘‘राज्याच्या अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्हे आणि तालुके अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता परतीचा पाऊस तरी जोरदार पडू दे आणि राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळू दे,’’ असे साकडे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. १७) गणरायाच्या चरणी घातले.