

PNE26W52217 सोलापूर ः चंद्रकांत पाटील यांनी श्री बसवारूढ मठाला भेट दिल्यानंतर त्यांचा सन्मान करताना ष.ब्र.शिवपुत्र अप्पाजी स्वामी, मोहन डांगरे, मल्लिनाथ बनशेट्टी आदी
मठाच्या पावित्र्याला धक्का नको : पाटील
श्री सद्गुरू बसवारूढ मठाला भेट; शिवपुत्र आप्पाजींचे घेतले आशीर्वाद
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : श्री सद्गुरू बसवारूढ मठाच्या धार्मिक परंपरेला अन् भक्तांच्या श्रद्धेला कोणत्याही परिस्थितीत बाधा पोहोचता कामा नये. मठाचे पावित्र्य, शांतता अन् सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
सोलापूर विमानतळ परिसरातील शांतीनगर-कस्तुरबा नगर येथील श्री सद्गुरू बसवारूढ मठाला भेट देऊन पाटील यांनी मठाधिपती श्र. ब्र. सद्गुरू शिवपुत्र आप्पाजी यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. मठात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. यावेळी शिवपुत्र आप्पाजी यांनी त्यांचे स्वागत केले.
-----
मठाच्या परंपरा अन् धार्मिक उपक्रमांवर संवाद
श्री सद्गुरू बसवारूढ मठाशी पाटील यांचे अनेक वर्षांपासून श्रद्धेचे अन् आत्मीयतेचे नाते आहे. त्यांचे गुरुवर्य लिंगैक्य श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांच्याशी निकटचे आध्यात्मिक नाते होते. गुरुवर्यांच्या चरणी असलेली त्यांची श्रद्धा आजही कायम आहे. यावेळी पाटील यांनी शिवपुत्र आप्पाजी यांच्याशी मठाच्या परंपरा, धार्मिक उपक्रम तसेच भक्तांच्या श्रद्धेबाबत संवाद साधला. मठ हा असंख्य भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र, धर्मगुरूंचे स्थान अन् गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जपणारे पवित्र आध्यात्मिक स्थान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
-------
कायदा-सुव्यवस्था राखून धार्मिक स्थळांचे रक्षण करा
मठाच्या धार्मिक परंपरेला बाधा येणार नाही अन् भक्तांच्या श्रद्धेला धक्का पोहोचणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. मठाच्या परिसरात शांतता, सुरक्षितता अन् धार्मिक वातावरण कायम राहण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था राखत अशा पवित्र धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.