पवारांबद्दल माझ्या मनात आदर आहे पण... : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

'शरद पवारांबद्दल माझ्या मनात आदर आहे पण, वाईट याचं वाटतं की, त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोटेक्ट करावं लागतं'' अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

पुणे : ''मुख्यमंत्र्यांनी प्रवास सुरु केला ही स्वागतार्ह बाब आहे मात्र, मुख्यमंत्री दौऱ्यामध्ये काहीतरी घोषणा व्हायला व्हायला हवी होती'' अशा शब्दांत भाजप प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका केली.तसेच, ''शरद पवारांबद्दल माझ्या मनात आदर आहे पण, वाईट याचं वाटतं की, त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोटेक्ट करावं लागतं'' अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल सोलापुर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री दौऱ्यायाबाबत बोलताना, पाटील म्हणाले की, ''मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही, कोरडा प्रवास नको. मुख्यमंत्री आहेत, निर्णय घेऊ शकतात. त्यांनी तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यासाठी पंचनामे करण्याची गरज नाही.'' 

''प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते नंतर, केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषीत करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं,'' अशा शब्दात पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोटेक्ट करावं लागतं : चंद्रकांत पाटील
''शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोटेक्ट करावं लागतं, याचं वाईट वाटतं. हे ते मनापासून करत असतील असं वाटत नाही. सरकार एकत्र चालवायचं म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांची भलामण करताहेत. ''बाबा, मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड, असं पवारांना वाटत असेल." अशी खोचक टीका पाटील यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर केली.

''नाथाभाऊ कुठेही जाणार नाही : चंद्रकांत पाटील

''नाथाभाऊ कुठेही जाणार नाही, त्यामुळे सगळ्यांचा हिरमोड होईल भाजपचं नुकसान होईल असं खडसे वागणार नाहीत. प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला एकनाथ खडसे उपस्थित होते. खडसे नाराज असतील त्यांची नाराजी दुर करतोय, ते पुन्हा सक्रिय होतील;''  असे सांगून एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी खंडन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Criticize about CM Uddhav Thackeray Tour Flood affected area