'उद्धवजींवर माझं प्रेम, पण काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांना फसवतंय'

अमोल कविटकर
शनिवार, 28 डिसेंबर 2019

उद्धजींबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर, पण त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीवाले फसवत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले.

पुणे ः उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी पूर्णपणे फसवी आहे. निकषांच्या मुद्द्यावरून आमच्या कर्जमाफीवर आक्षेप घेतला गेला, पण या कर्जमाफीलाही निकष आहेत. २ लाख कर्ज थकलेला शेतकरी उरलाच नाही, मग कोणाची कर्जमाफी करणार? असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, पुणे महापौर प्लॉगेथॉन २०२० या पुणे शहर स्वच्छ करणाऱ्या उपक्रमात चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, ''उद्धजींबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर, पण त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीवाले फसवत आहेत. आम्ही मध्यम कर्जाची माफी केली होती, ती या सरकारने केली नाही. तुम्ही केवळ पीककर्ज माफ करता आहात का? काँग्रेसच्या बँका, कारखाने आणि सूतगिरण्या यातून सुटण्यासाठी ही कर्जमाफी आहे का. असा सवालही त्यांनी यावेळी केला.''

दोन लाखांची कर्जमाफी म्हणणाऱ्या सरकारनेही शेतकऱ्यांवर घातली 'ही' बंधने

अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर  कर्ज घेतलेली असतात, ती रक्कम ते कारखाने वापरतात, त्याबद्दल काँग्रेसने अट घातली आहे. या कर्जांची रक्कम दोनशे कोटींच्या घरातही आहे. ती कर्ज माफ केली जाणार आहेत. सरसकट म्हणताना याचं भान ठेवणार आहात की नाही? असा सवालही पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कर्जामुळे काहींना अटक झाली आहे, पण या माफीमुळे ते सुटतील. उद्धवजी, ही कर्जमाफी सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारी नाही, अशा प्रकारची टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil criticizes Thackeray government