
पुणे : ‘भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्यासाठी शिक्षण क्षेत्राला महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागणार आहे. नवोन्मेष, संशोधन आणि विद्यार्थ्यांमध्ये जागतिक क्षमतेचा विकास हे आपले ध्येय असले पाहिजे. शिक्षकांनी गुरूपदाचे स्थान उंचावले पाहिजे,’’ असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.