esakal | Vidhan Sabha 2019 : अखेर चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil filed nomination from BJP in kothrud assembly constituency.jpg

पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Vidhan Sabha 2019 : अखेर चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अनेक चर्चा, वाद आणि विरोधानंतर चंद्रकांत पाटलांना ही उमेदवारी मिळाली. कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी याही अर्ज भरण्यासाठी उपस्थित होत्या. 

Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारास प्रारंभ

काल (ता. 2) चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मोतीबागेतून प्रचाराला सुरवात केली होती. कालच्या प्रचार मेळाव्यातही त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. कोल्हापूरचे असलेलेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या उमेदवारीसाठी प्रचंड विरोध झाला. स्थानिकांना डावलून ही उमेदवारी दिल्याने भाजप तसेच शिवसेनेतही नाराजी बघायला मिळाली. तसेच बंडाच्या चर्चाही ऐकायला मिळत होत्या.

या सर्वांतून मार्ग काढत भाजपकडून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी निश्चित झाली आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. कोथरूडमधील शिवसेनेचे इच्छूक चंद्रकांत मोटे, मुरलीधर मोहोळ यांनीही पाटलांना पाठिंबा दिला. अर्ज भरण्यासाठी आ. मेधा कुलकर्णी, खा. गिरीश बापट, खा. संजय काकडे उपस्थित होते. 

loading image
go to top