Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या निकालाआधी चंद्रकांत पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Bypoll Election

Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या निकालाआधी चंद्रकांत पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान?

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून पुण्यात बॅनरबाजी दिसून आली आहे. सुरुवातीपासून पुण्यात बॅनर वॉर बघायला मिळाले आहे. पुणेरी पाट्या असतील किंवा निवडणूकीच मतदान झाल्यानंतर लगेचच विजयाचे लागलेल बॅनर पाहायला मिळाले. त्यामुळे एकूणच पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या.

दरम्यान, मतमोजणी होऊन निकाल लागण्यासाठी काही तास शिल्लक असतांनाच आमदार म्हणून निवड झाली अशा आशयाचे बॅनर, फ्लेक्स लावलेले पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अतिउत्साही पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.

कसबा मतदार संघात हेमंत रासने त्याचबरोबर अश्विनी जगताप प्रचंड बहुमताने आमदार म्हणून निवडुन आल्याचे बॅनर झळकले आहे. इतकंच काय पिंपरी चिंचवड आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरही बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

निकालाआधी बँनर लावाण्याची घाई कोणी करू नका, 2 तारखेच्या निकालानंतर बँनर्स लावा अशा सूचना यावेळी कार्यकर्त्यांना वरिष्ठ स्तरावरून दिल्या गेल्या आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.

उद्या कसबा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी असून त्या आधी विजयाचे बॅनर लावण्यात आल्याने भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी कान टोचले आहे. त्यामुळे भाजपाला पराभवाची भीती आहे की कार्यकर्त्यांना सल्ला आहे यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कसबा मतदार संघात भाजपच्या आधीच कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर झळकले होते. त्यामुळे विजयाचे बॅनर झकविण्याची स्पर्धाच एकप्रकारे पुण्यात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या दुपार पर्यंत हे निकाल स्पष्ट होणार आहेत.