

Chandrakant Patil honors Sunny Phulmal after winning gold
sakal
लोहगाव : बहरीन येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत लोहगावचा कुस्तीपटू सनी फुलमाळी याने ६० किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सनीच्या या उल्लेखनीय यशानंतर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सनीच्या लोहगाव येथील घरी भेट देऊन त्याचा सन्मान केला. या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांनी सनीच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करत त्याचे पालकत्व स्विकारण्याची घोषणा केली.