Chandrakant Patil |'हिंदू मार नही खाएगा', अमरावतीतील हिंसाचारानंतर पाटील स्पष्टच बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant dada Patil

'हिंदू मार नही खाएगा', अमरावतीतील हिंसाचारानंतर पाटील स्पष्टच बोलले

अमरावतीत झालेल्या हिंसाचारावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील प्रतिक्रिया स्वाभाविक असल्याचं सांगितलं. 'हिंदू मार नही खाएगा' असं म्हणत त्यांनी विरोधकांची भूमिका स्पष्ट केली.

त्रिपुरातील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या जमावातील काहींनी दुकानं बंद करण्याची मागणी केली. यावेळी दगडफेकही झाली. त्याचं रुपांतर हिंसाचारात झालं. यानंतर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवाही बंद आहे.

अमरावतीतील प्रकार समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांनी त्यावर भाष्य करण्यात सुरुवात केली. आज चंद्रकात पाटील यांनीही अमरावतीत रस्त्यावर उतरलेल्या १५-२० हजार जनसमुहावरही आक्षेप नोंदवला.पण आता पाटील यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. "त्रिपुरात काय घडलं, माहिती नाही. त्याची प्रतिक्रिया अमरावती, मालेगावमध्ये उमटते. प्रतिक्रिया म्हणून धरणे, उपोषण, निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं मी समजू शकतो. पण १५-२० हजारांच्या संख्येने रस्त्यावर उतरायचं का?", असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

"माजी मंत्री जगदीश गुप्तांसह सगळ्यांची कार्यालये, दुकानं फोडण्याचा काय संबंध आहे. त्यात कुणाचा हात आहे? जर १३ नोव्हेंबरच्या हिंसाचारात भाजपाचा हात असेल, तर मग १२ नोव्हेंबरच्या हिंसाचारात संजय राऊत यांचा हात आहे का?", असा प्रश्न उपस्थित करत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

"आम्ही बाळासाहेब ठाकरेंना वंदन करणारे"

१३ नोव्हेंबरची अमरावतीतील प्रतिक्रिया 'हिंदू मार नही खाएगा' अशी होती. तो स्वाभाविक प्रतिसाद होता. मी चिथावणी देतोय असं वाटत असेल, पण खऱ्याला खरं म्हणायला आम्हाला कधीही भीती वाटत नाही. आम्ही जसे संघाचे कार्यकर्ते आहोत, तसे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारे आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी असा बोटचेपेपणा केला असता तर १९९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदू जीवंत राहिला नसता," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

loading image
go to top