

खडकवासला : ‘सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा. त्याला सुख मिळावे, तो सुरक्षित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांनी माणूस कर्जबाजारी का होतो, याची कारणे शोधली. संकटकाळात सामान्यांवर आर्थिक भार पडतो.
त्याकाळात विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याचे काम मोदी सरकारने केले.’ असे मत राज्याचे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या स्थानिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या ऑक्सिजन पार्क, नक्षत्र- उद्यानाचे भूमिपूजन पाटीलांच्या हस्ते झाले.
जुन्या कोपरे गावाच्या हद्दीत खडकवासला धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या पडीक जागेत पार्कसह विविध मूलभूत सुविधा होणार आहेत. कोपरे, कोंढवे- धावडे, उत्तमनगर, शिवणे येथील नागरिकांना याचा दैनदिन फायदा होणार आहे.
आमदार भीमराव तापकीर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे संचालक रमेश कोंडे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे कार्यक्रमाला उपस्थित होते. आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले.
न्यू प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीब, गरजू कुटुंबांना ३०० वर्ग फुटांचे घर मिळत आहे. येत्या जूनपासून राज्यात आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
आयुष्मान भारत कार्डद्वारे प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढणार आहे. असे सांगून पाटील म्हणाले, पाटबंधारेची जागा कोणीतरी बळकवणार होते. येथे बीओटी (बांधा,वापरा,हस्तांतरण) तत्वावर काही तरी सुरू होणार होते.
आमदार भीमराव तापकीर आणि सरकारच्या वतीने पुढाकार घेत यासाठी निधी मिळवला. आणि आज ऑक्सिजन पार्क, नक्षत्र उद्यानाचे भूमिपूजन झाले. त्यामुळे बीओटीचा विषय संपला. अशा प्रकारे रचनात्मक कामाची दृष्टी आमदार तापकीरांची दिसून आली. ऑक्सिजन पार्कमुळे हवा शुद्ध राहील. स्थानिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याची सोय होणार आहे.
आमदार तापकीर म्हणाले, ‘कुडजे रस्त्याचे रुंदीकरण झाले. रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. प्रदूषण कमी करण्यासाठी ऑक्सिजन पार्क उभारत आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये देशी प्रजातीची झाडे लावणार आहे. कोणी एकला नाही आणि कोणी पहिला नाही. एवढा निधी खडकवासला मतदार संघात मिळाला आहे.’
यावेळी व्यासपीठावर सचिन मोरे, गणेश वरपे, सुभाष नाणेकर, मनीषा मोरे, निखिल धावडे, रश्मी घुले, ममता दांगट, दत्ता कोल्हे, सचिन दांगट, मारुती किंडरे, अरुण दांगट, रुपेश घुले, उमेश सरपाटील, अभिजीत धावडे, स्मिता धावडे, नवनाथ तागुंदे, सचिन पायगुडे, गणेश वांजळे यासह अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी कोंडे, नाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन वैभव मुरकुटे यांनी केले.
आमदार भीमराव तापकीर भूमिपूजनाच्या ठिकाणी पोचले. पर्यटन किंवा पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते. ठेकेदाराने फक्त विटा, माती, नारळ आणून ठेवले होते. भूमिपूजनाची तयारी पूर्ण झाली नव्हती.
आमदारांनी ठेकेदाराची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी व सोबतच्या ग्रामीण कार्यकर्त्यांनी विटा चौकोनी मांडल्या. त्यात माती ओतली. मंत्री चंद्रकांत पाटील पोचले. तरी पूजेचे ताट, कुदळ, फावडे नव्हते. दरम्यान, तापकीर यांनी ऑक्सिजन पार्कची माहिती पाटील यांना दिली. तोपर्यंत उर्वरित साहित्य पोचल्यावर भूमिपूजन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.