Vidhan Sabha 2019 :..जेव्हा चंद्रकांत पाटील गातात गाणं (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

निकालाच्या आकड्यांची जुळवाजुळव होतेय, कोण हरणार अन् कोण जिंकणार? यावर पैजा लावल्या जातायेत, संख्याबळाचे अंदाज मांडतायेत, या साऱ्यात राजकीय माहोल गरम झालाय.

पुणे : निकालाच्या आकड्यांची जुळवाजुळव होतेय, कोण हरणार अन् कोण जिंकणार? यावर पैजा लावल्या जातायेत, संख्याबळाचे अंदाज मांडतायेत, या साऱ्यात राजकीय माहोल गरम झालाय. पण पुण्यातल्या निवडणूक रिंगणातल्या उमेदवारांनी मंगळवारी धमाल केली. राज्याचे लक्ष वेधून घेतलेले अन् राजकीय प्रतिष्ठापणाला लागलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी चक्क 'तुझी माझी जमली जोडी' कोळीगीत गायलं.

ज्येष्ठ वात्रटटिकाकार रामदास फुटाणे यांनी वात्रटटिका सादर करीत राजकारी, राजकीय पक्षांवर फटकारे ओढले. निकालाचा ताण असतानाही आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात उमेदवाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद लकेर पाहायला मिळाली.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील म्हात्रे पूल येथील सिद्धी बैंक्वेट हॉलमध्ये 'दिवाळीचा राजकीय सांस्कृतिक फराळ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात पुण्यातील निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार आणि प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी चक्क गाण गायलंय. अभिनेता प्रवीण तरडे आणि विनोद सावंत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

किती मतांनी बाजी मारणार ? याची ताळेबंद आकडेमोड तयार होतेय रिंगणातले आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचा निकाल, त्यातलं मताधिक्‍य या साऱ्याचा ताण असूनही पुण्यातील निवडणूक रिंगणातल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी मंगळवारी धमाल केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Sing Song In Pune