महाराष्ट्रात 4 वर्षे विरोधात बसण्याची आमची तयारी पण सरकार चालेल का? 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागत आहे. अनेकदा ठाकरे सरकार लवकरच पडणार अशा चर्चाही अधून मधून होत असतात. त्यातच आता बिहारचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा होत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणूकीबाबत विचारले असता, ''मला बिहार बाबत फार काही माहिती नाही. त्यामुळे तिथल्या राजकारणाबद्दल बोलता येणार नाही.'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुणे : ''पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपची विजयाची परंपरा कायम राहील. बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येईल. महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या या निकालावर ही त्याचा परिणाम होईल, त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर ही त्याचा परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागत आहे. अनेकदा ठाकरे सरकार लवकरच पडणार अशा चर्चाही अधून मधून होत असतात. त्यातच आता बिहारचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा होत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणूकीबाबत विचारले असता, ''मला बिहार बाबत फार काही माहिती नाही. त्यामुळे तिथल्या राजकारणाबद्दल बोलता येणार नाही.'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्यातील राजकारणाबाबत बोलताना पाटील यांनी म्हटलं की, ''महाराष्ट्रात आणखी चार वर्ष विरोधात बसण्याची तयारी आम्ही केली आहे. परंतु हे सरकार आणखी चार वर्ष चालेल असं वाटत नाही, आपापसातील भांडणामुळे हे सरकार पडेल मात्र आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही आम्ही घटनेच्या विरोधात कोणतेही काम करणार नाही.''

कोण घालणार आवर, समाजमंदिरावर टॉवर! भाड्यापोटी येणारे शुल्क नगरसेविकेच्या पतीच्या खिशात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर हळू हळू नियम शिथिल केले जात आहेत. मात्र, राज्यातील मंदिरे अद्याप उघडण्यात आलेली नाहीत. त्याबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की,''सर्वच प्रार्थनास्थळ खुली करावी अशी आमची मागणी आहे. मंदिर, मशीद, विहार हे सगळी खुली व्हावीत, ज्यांना वाटतं मंदिरात जाणं हे थोतांड आहे, त्यांनी जाऊ नये, परंतु ज्यांना जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मंदिरे खुली केली जावीत.''
 
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant Patil Speaks About Bihar Election and Maharashtra Government